घरफोडी, लुटमार करणारे सराईत आरोपी जेरबंद

 घरफोडी, लुटमार करणारे सराईत आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरीनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे दि.14 ऑक्टोबर रोजी कांताबाई बबन घोडेकर यांच्या घरात घुसुन कांताबाई यांना मारहाण करीत व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड असा 32 हजारांचा मुद्देमाल लांबविण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत लूटमार करणारे तीन सराईत आरोपी जेरबंद केले आहेत. किरण निरवशा भासेले (वय 50, रा.येळपणे, ता.श्रीगोंदा), केशव किरण भोसले (वय 21, रा.येळपणे, ता.श्रीगोंदा), लखन किरण भोसले (वय 18) या तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेला मुद्देमाल शंभू कुंज्या चव्हाण (रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा) याच्याकडे असल्याचे सांगितले. चव्हाणचा शोध घेतला असता तो फरार झाला. तिघाही आरोपींना पुढील कारवाईसाठी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सपोनि शिशिरकुमार देशमुख, मनोज गोसावी, विजय वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, रेहित मिसाळ, रोहिदास नवगिरे, सागर सुलाने, येमूल, चंद्रकांत कुसळकर यांच पथकाने ही कामगिरी केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post