शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर, नगरची जबाबदारी दादाजी भुसेंवर

 शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर, नगरची जबाबदारी दादाजी भुसेंवर

मंत्री शंकरराव गडाख यांना 'या'दोन जिल्ह्यांची जबाबदारी
मुंबई:  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्ह्यांसाठी पक्षाकडून संपर्क मंत्री  जाहीर केले आहे. यात नगर जिल्ह्याची जबाबदारी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या वर सोपविण्यात आली आहे. जलसंंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सोलापूर, सांगली जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.इतर संपर्कमंत्री पुढीलप्रमाणे – एकनाथ शिंदे (चंद्रपूर, गोंदिया), उदय सामंत (कोल्हापूर, सातारा), दादा भुसे (नाशिक, नगर), गुलाबराव पाटील (बुलढाणा, अमरावती), अॅड. अनिल परब (पुणे, रायगड), शंकरराव गडाख (सोलापूर, सांगली), संजय राठोड (नांदेड, भंडारा-नागपूर), अब्दुल सत्तार (नंदूरबार, वर्धा), शंभुराज देसाई (हिंगोली, परभणी), संदीपान भुमरे (बीड, लातूर).

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post