पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने समर्थकाने केलं असे काही....

 पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने समर्थकाने केलं असे काही.... 

मुंडेंनी घेतली दखल, म्हणाल्या ''हि निरपेक्ष तळमळ ऊर्जा आणि निर्धार देणारी".नगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघात झालेल्या पराभवाचा अनेक निष्ठावान कार्यकर्त्याना धक्का बसला. एका समर्थकाने तर निराशेतून पायात चप्पलच घालायचं सोडून दिले. तब्बल एक वर्षापासून अनवाणी फिरणार्या या समर्थकांची माहिती कळताच मुंडे यांनी त्याला बोलावून घेतले. त्याची चौकशी केली व त्याला स्वहस्ते चप्पल देऊन ती परिधान करायला लावली. हा समर्थक म्हणजे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथिल नितीन महाजन.

आज स्वता पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत महाजन यांच्याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की,

"परळी विधानसभेतील पराभवानंतर जवळपास एक वर्ष पायात चप्पल न घालून शोक पाळणारा माझा  पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील कार्यकर्ता नितीन महाजन याला आज मी स्वहस्ते चप्पल परिधान करण्याचा आग्रह करुन त्याचे व्रत पुर्ण केले!

ही निरपेक्ष तळमळ ऊर्जा आणि निर्धार देणारी".

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post