शिर्डीतील साई मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार

 शिर्डीतील साई मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार

चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला हिंदुत्त्व शिकवू नये : खा.सदाशिव लोखंडेनगर : करोना काळात बंद असलेली मंदिरे उघडण्या संदर्भात केवळ एका मंदिराचा नाही, तर संपूर्ण राज्याचा विचार मुख्यमंत्री ठाकरे करीत आहेत. मात्र ज्या वेळी तिरुपती बालाजीचे मंदिर चालू केले, तेव्हा तेथील अनेक कर्मचारी बाधित झाले होते. शिर्डीत देखील करोन प्रादुर्भाव वाढत होता. आता शिर्डीत बधितांची संख्या कमी प्रमाणात होत असल्याने तेथील मंदिर चालू करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली आहे.

नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना खा.लोखंडे यांनी शिर्डीचे मंदिर खुले व्हावे ही माझीही भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी खा.लोखंडे यांनी भाजपने मंदिर खुली करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरही टिकास्त्र सोडलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला हिंदुत्त्व सांगण्याची गरज नाही. हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. ते सर्वांना माहिती आहे. मात्र केवळ लोकांच्या आरोग्याचा विचार करून मुख्यमंत्री यांनी मंदिर बाबतचा निर्णय घेतलाय. त्यामध्ये राजकारण करू नये, असा सल्ला खा.लोखंडे यांनी दिला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post