ज्येष्ठ नेते, माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन


ज्येष्ठ नेते, माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन

 


नगर : शेवगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.टि.के.पुरनाळे यांचे गुरुवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. आबासाहेब काकडे शिक्षण समूहाच्या प्रगतीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते ८० वर्षांचे होते.

 डॉ. टी. के .पुरनाळे निधनाची वार्ता समजताच तालुक्यातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या विकास कामांत त्यांचे मोलाचे योगदान असल्याने तालुकाभर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते, नातेवाईक, स्नेहीजन यांचे मोठे जाळे आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी शेवगांवकडे धाव घेतली. जि. प. सदस्या हर्षदाताई काकडे यांचे ते वडील तर आबासाहेब काकडे शिक्षण समुहाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांचे ते सासरे होत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post