राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान



पुणे- कोरोनाच्या काळात माहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सचिन इटकर, श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, ज्येष्ठ पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती, 'रक्ताचे नाते' संस्थेचे राम बांगड, 'जागृती ग्रुप'चे राज देशमुख, किरण साळी, प्रा. अक्षीत कुशल, प्रा. रामचंद्रन आदी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तथापि, 26 फेब्रुवारीपासूनच प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत अचूक आणि तात्काळ पोहोचवण्यात माहिती कार्यालय आघाडीवर होते. ‘लॉकडाऊन’मध्ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्यमांचा प्रभावी वापर करुन अधिकृत माहिती पोहोचवण्यात येत होती. त्यामुळे सोशल मिडीयावरील अफवांचे निराकरण करण्यास मदत झाली. याबाबींची दखल घेवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध दिवाळी अंकांत त्यांची 11 हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post