केडगावच्या रेणुकामंदिरात विधीवत घटस्थापना

केडगावच्या रेणुकामंदिरात विधीवत घटस्थापना

भाविकांसाठी मुखदर्शनाची सोयकेडगाव :  नगरकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत पुजा करून घटस्थापना करण्यात आली . मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन तसेच मुखदर्शनाची सुविधा करण्यात येत आहे .

केडगावच्या रेणुकामंदिरात आज सकाळी ६ वाजता अभिषेक करण्यात आला . मंदिर परिसरातील मंगळाई देवी , भवानी गुरव यांच्या पादुका , भैरवनाथ मंदिर पुजन , परशुराम पुजन झाल्यानंतर केडगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांच्या हस्ते विधीवत पुजा होऊन सपत्निक घटस्थापना करण्यात आली . यावेळी महाआरती करण्यात आली . देविला पारंपारिक आभुषणे परिधान करण्यात आली होती . मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . पुजारी राजु गुरव, राम गुरव, शंकर कदम , शेखर गुरव , सुनील गुरव आदिंनी पौराहित्य केले .

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणुन नवरात्र उत्सव काळात मंदिराचे भाविकांसाठी बंद राहणार असुन मुखदर्शन व ऑनलाईनदर्शनाची सोय मंदिराच्या बाहेरून करण्यात आली आहे . यंदा मंदिर परिसरात यात्रा भरणार नसल्याने एकही स्टॉल लागला नाही 

मंदिर परिसरात भाविकांना मज्जाव असला तरी मंदिरात दरवर्षि प्रमाणे घटस्थापना , दोन वेळा आरती , ललित पंचमीला कुंकुम आर्चन , सातव्या माळेला फुलोराचा नैवेद्य , नवमीला होमहवण , दसऱ्याला शस्त्र पुजन आदि धार्मिक विधी नियमाप्रमाणे होणार आहेत .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post