पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रियापुणेः भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. त्यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

मला असं वाटत नाही, पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून कोणी ऑफर दिलेली आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या ऑफर फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच देऊ शकतात, असं संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. खोतकर हे मराठवाड्यातील नेते आहेत. त्यांची एकत्र काही चर्चा झाली असेल. ते मला काही माहीत नाही. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. एकनाथ खडसे हे गेल्या चार वर्षांपासून त्यांची खदखद व्यक्त करत होते. त्या खदखदीचा शेवट काय झाला आपण पाहिलाच, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post