करोनाची महामारी संपुष्टात येण्यासाठी देवीला आर्त हाक...

 करोनाची महामारी संपुष्टात येण्यासाठी देवीला आर्त हाक...

नगरच्या युवतीची अभिनव कलाकारी



नगर -   डिसेंबर 2019 पासून जगावर कोरोनावर घातलेले संकट आता डिसेंबर 2020 पर्यंत तरी या कोरोनाचा नायनाट होऊ दे, तुझी कृपा आमच्यावर सदैव राहू दे अशी आर्त हाक कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरीच महालक्ष्मी, मोहटादेवी आदिंची रुपे रांगोळीतून साकारुन दिली.

     नगरमधील सावेडी, पाईपलाईन रोडवरील नूतन जवाहर भुजबळ या महिलेने कोरोना संकटात सर्व सण उत्सव साजरे झाले नसल्याने आषाढी एकादशीला देखील विठ्ठल-रुख्मिणीची रांगोळीतून मूर्ती साकारली होती. आता कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्या घरातच देवीची विविध रुपे साकारुन या 2020 सालातच कोरोनाचा नायनाट करण्याची देवीला प्रार्थना केली आहे.  त्यांच्या या रांगोळीतून साकारलेल्या देवीच्या प्रसन्न मूर्ती परिसरातील नागरिकांनी पाहताच समाधान व्यक्त केले.नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नूतन या स्नुषा आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post