....तरीही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर कायम कसे?

....तरीही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर कायम कसे?

गृहमंत्री अमित शहांच्या भूमिकेनंतर शरद पवारांचा सवाल तुळजापूर : मंदिरांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नाराजी व्यक्त केली. शाहांच्या या नाराजीवर बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांच्या नाराजीनंतरही भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर कायम कसे असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. तुळजापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 1957 पासून महाराष्ट्राचे सगळे राज्यपाल पाहिले. 1967 नंतरच्या राज्यपालांशी माझा थेट संबंधही आला. असं भाष्य करण्यासंबंधीची भूमिका कोणी दाखवली नव्हती. हे पद अतिशय महत्त्वाचं आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, तशीच मुख्यमंत्री या पदाचीही प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. ती प्रतिष्ठा राज्यपालांकडून ठेवली गेली नाही तर साहजिकच अस्वस्थता येतेच. एक चांगली गोष्ट आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्यांची कानउघाडणी केली. स्वाभिमान असेल तर त्यांनी या पदावर राहायचं की नाही हा विचार करावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post