’जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’...पवारांची ‘पॉवर’...VIDEO

’जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’...पवारांची ‘पॉवर’

राष्ट्रवादीने जागवल्या पवारांच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेच्या आठवणीमुंबई: चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारुला लगाम बसवणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  शरद पवार यांची सातार्‍यात भर पावसात झालेली सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली होती. सातार्‍यातील भर पावसातील सभेला आज दि.18 ऑक्टोबर रोजी वर्ष पूर्ण झाले. राज्यात सत्ताबदल करण्याइतपत वातावरण बदलणार्‍या या सभेच्या आठवणी राष्ट्रवादी कॉंग्रेसनं सोशल मीडियावर जागवल्या आहेत. त्या आठवणी जागवताना भारतीय जनता पक्षालाही टोलेही हाणले आहेत. आजच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं राष्ट्रवादी कॉंग्रेसनं एक ट्वीट करून त्या सभेच्या आठवणी जागवल्या आहेत.

’त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण पैलवानच समोर दिसत नाहीत, अशी दर्पोक्ती केली. ते म्हणाले, शरद पवार संपले. पण  ऑक्टोबर 18 रोजी सातार्‍यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला,’ असं ट्वीट पक्षानं केलं आहे. ’जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली,’ असंही त्यात म्हटलं आहे. राष्ट्रवादीने एक व्हिडिओही सोशल मिडियावर शेअर केला आहे.

VIDEO
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post