पाऊस पाठ सोडेना...पुन्हा एकदा राज्यात अतिवृष्टीचा इशारा

 पाऊस पाठ सोडेना...पुन्हा एकदा राज्यात अतिवृष्टीचा इशारापुणे : करोनाकाळात जनजीवनावर मोठा परिणाम झालेला असताना पावसाचे धुमशान अजूनही महाराष्ट्राची पाठ सोडायला तयार नाही. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहे. या पावसाचा जोर ओसरत नाही, तोच पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 20, 21 आणि 22 तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post