प्र.पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई

 


प्र.पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई

पाथर्डी, कर्जत तालुक्यात मटका अड्डे, अवैध दारु विक्रीवर छापेनगर : प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केली असून नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. दि.22 ऑक्टोबर रोजी विशेष पथकातील पोसई सुनिल सूर्यवंशी यांच्या टिमने पाथर्डी पोलिस ठाण्याअंतर्गत तिसगाव येथे मटका अड्डयावर छापा टाकून संभाजी विठ्ठल गार्डे व शेरखान शेख (दोघे रा.तिसगाव, ता.पाथर्डी) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून 5 हजार 380 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याच पथकाने कर्जत तालुक्यातील माहिजळगांव येथेही छापा टाकून आरोपी अय्यास रहीम शेख याच्याविरुध्द अटकेची कारवाई केली. त्याच्या ताब्यातून 1800 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.  माहीजळगाव येथेच देशी दारुच्या सुमारे 520 रुपये किंमतीच्या बारा बाटल्याही जप्त् करण्यात आल्या आहेत. यातील आरोपी अतुल मच्छिंद्र साबळे फरार झाला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post