सणानिमित्त स्टेट बँकेची ग्राहकांना अनोखी भेट...‘या’ कर्जांवर प्रक्रिया शुल्कात सवलत

 सणानिमित्त स्टेट बँकेची ग्राहकांना अनोखी भेट...‘या’ कर्जांवर प्रक्रिया शुल्कात सवलतनवी दिल्ली: दसरा दिवाळीच्या उत्सवी वातावरणात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफरमध्ये बँक स्वस्तात गोल्ड, कार आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांना देत आहे. याशिवाय या सर्व कर्जावरील प्रक्रिया शुल्क बँकेने कमी केले आहे. एसबीआयच्या योनो ऍपच्या माध्यमातून, जे कर्ज घेतात त्यांना प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

एसबीआयने अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करुन या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिले आहे की या उत्सवाच्या हंगामात सोने, कार व वैयक्तिक कर्जावर विशेष ऑफर येत आहेत. योनो ऍपद्वारे ग्राहक या कर्जासाठी अर्ज करु शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post