बिहारमध्ये प्रचाराला जाणे भोवले, अभिनेत्रीचा गंभीर खुलासा

 

बिहारमध्ये प्रचाराला जाणे भोवले, अभिनेत्रीचा गंभीर खुलासामुंबई : बिहार निवडणुकीत प्रचारासाठी गेले असताना माझा बलात्कार आणि हत्या झाली असती. मी मोठ्या मुश्किलीने त्या संकटातून सुटल्याच खळबळजनक  वक्तव्य अभिनेत्री अमिषा पटेल हिने सांगितलं आहे. अमिषाने चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते प्रकाश चंद्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जबरदस्तीने आपला प्रचार करण्यास सांगितले. तसेच न केल्यास धमकीही दिल्याचा आरोप अमिषाने केला आहे


अमिषा म्हणाली, “मी एक पाहुणी म्हणून डॉ. प्रकाश चंद्रा यांच्याकडे गेली होती. मात्र, ते लोकांना ब्लॅकमेल करतात आणि धमकावतात. त्यांनी मला आणि माझ्या टीमला वाईट पद्धतीने धमकावलं आणि गैरवर्तन केलं. मी सायंकाळी मुंबईला परत आल्यानंतर देखील त्यांनी मला धमकी देणारे मेसेज आणि कॉल केले. तसेच माझ्याबद्दल चांगलं बोला आणि 26 ऑक्टोबरला जे घडलं त्याविषयी बोलू नका. त्यांनी मला ब्लॅकमेल करत पैसे देतो पण लोकांसमोर माझ्याविषयी चांगलं बोल असं सांगितलं.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post