वाडियापार्कसह इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी खुली करावीत

 शहरातील  वाडियापार्कसह इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी खुली करावीत 

माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांची मागणी
नगर - राज्यासह देशात कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्या पासून बंद असलेली क्रीडागणे वाडियापार्क व इतर मैदाने नागरिकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात  यावी.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील.

अनेक दिवसापासून मैदाने बंद असलेने नागरिकांना मोकळा श्वास घेता येत नाही .अनेक नागरिकांना सकाळी-  संध्याकाळी फिरण्याची सवय लागलेली असताना अचानकपणे सर्व बंद असल्याने नागरिकांना फिरता येत नाही .परिणामी त्याच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो . 

सर्व क्रीडांगणे मैदाने बंद असल्याने नागरिक रस्त्याने पहाटे किंवा रात्री फिरत असतात त्यामुळे नागरिकांना रस्त्याने ये-जा करणारे मोठ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका असतो.

आता सर्वत्र हळूहळू सर्व कामकाज सुरळीत सुरु झाल्याने हि मैदाने हि सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी शहर शिवसेनाप्रमुख संभाजी कदम यांनी  जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post