‘ओबीसीं’ना केंद्राचे मोठे गिफ्ट, सैनिकी शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण

 


‘ओबीसीं’ना केंद्राचे मोठे गिफ्ट, सैनिकी शाळांमध्ये 27 टक्के आरक्षणनवी दिल्ली : 2021-22 शैक्षणिक सत्रापासून देशातील 31 सैनिक शाळांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सध्या सैनिक शाळांमधल्या 67 टक्के जागा या ज्या राज्यात शाळा आहे त्या राज्यातल्या किंवा केंद्र शासित प्रदेशातील मुलांसाठी असतात तर 33 टक्के जागा या इतर राज्यांमधल्या मुलांसाठी असतात. आता या दोन कॅटॅगरीमध्ये जनरल, एससी-एसटी, ओबीसी असा कोटा असणार आहे. सैनिक शाळांमधील ओबीसींसाठी 27 टक्के जागा या विद्यमान कोट्या व्यतिरिक्त असतील. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाबाबतचे निकष मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार आहेत. या कोट्यासंदर्भात सर्व शाळांच्या प्राचार्यांना 13 ऑक्टोबर रोजी आदेश देण्यात आला आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post