नगर तालुक्यातील 'या' विविध कार्यकारी सोसायटी वर प्रशासक नियुक्तीचे आदेश

नगर तालुक्यातील 'या' विविध कार्यकारी सोसायटी वर प्रशासक नियुक्तीचे आदेश

राजकीय आकसापोटी 120 सभासद शेतकर्‍यांना कर्ज देण्यास केली होती टाळाटाळ


 निंबोडीच्या विविध कार्यकारी सोसायटीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी मल्हार (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीकडून राजकीय आकसापोटी 120 सभासद शेतकर्‍यांना कर्ज देण्यास अडवणुक करण्यात आली असता, जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत नगर तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या आदेशाने सदर सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करत असल्याचे पत्र काढले आहे.

निंबोडी मल्हारच्या विविध कार्यकारी सोसायटीकडून सभासद असलेल्या गावातील शेतकर्‍यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील 120 शेतकर्‍यांचे खरीप पीक कर्ज देण्यात आले नाही. मागील महिन्या जन आधार संघटनेने नगर तालुका उपनिबंधक यांच्या कार्यालयात आंदोलन केल्यानंतर 60 शेतकर्‍यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली होती. तरी देखील सोसायटीने मंजुर झालेल्या 60 शेतकर्‍यांना दिड महिना होऊनही कर्जाची रक्कम अदा केली नाही.दि.22/10/2020,रोजी  संघटनेच्या वतीने पुन्हा जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात सात तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिलेल्या आदेश व सुचनांनी अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलकांनी निदर्शनास आणून  दिले व संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती. ठोस  निर्णय होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. सात तासाच्या आंदोलनानंतर सदर प्रकरण जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी गांभीर्याने घेऊन नगर तालुका उपनिबंधक के.आर. रत्नाळे यांना सदर सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले व या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या निर्णयाचे जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, सरपंच जयराम बेरड, वजीर सय्यद, अंबादास बेरड, संतोष उदमले, भैरवनाथ बेरड, मिजान कुरेशी, संदीप पानसरे, रावसाहेब झांबरे, शैलेश भोसले, दीपक गुगळे, अंबादास कराळे, सागर शिंदे, जोगेश गवळी, अजय सोलंकी, विक्रम बेरड, नाथा बेरड, गणेश निमसे, गौरव बोरकर, दत्तू पोकळे, राजू बेरड, शिवाजी जासूद, अशोक आढाव, पांडुरंग निंबाळकर, दीपक बेरड, भैय्या कराळे, सागर जाधव, राहुल शिंदे, खंडेराव बेरड, भाऊसाहेब साळवे, अर्जुन कराळे, दिगंबर शेलार यांनी स्वागत केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post