अखेर एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा

 अखेर एकनाथ खडसेंचा भाजपला रामराम, राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा

देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यपध्दतीवर तीव्र नाराजीजळगाव: भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी आज थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता खडसे यांच्यासोबत नेमके कोण-कोण जाणार याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केल्यानंतर खडसे यांनीही पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. आपण पक्षावर नाराज नसलो तरी आपल्याबाबतीत जे काही घडले त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post