नगर जिल्ह्यातील अनेक जण 'घड्याळ' बांधण्याच्या तयारीत

 

नगर जिल्ह्यातील अनेक जण 'घड्याळ' बांधण्याच्या तयारीत

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा दावा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. टिव्ही ९ वृत्त वाहिनीने सदर वृत्त दिले आहे.


राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास कोण-कोण उत्सुक आहेत त्यांचे नावे वेळ आल्यावर मी नक्की सांगेन, असंही तनपुरे म्हणाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. तसंच जे नाराज नेते आहेत त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा आहे, असा दावा मंत्री तनपुरे यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post