राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रे

 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्रेअहमदनगर(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विविध विभागातील पदाधिकार्‌यांची नियुक्ती करुन त्यांना आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलले. राष्ट्रवादी वक्ता सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नितीन लिगडे, सेवा दलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप सौदे, कार्याध्यक्षपदी शाहिद शेख, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश इंगळे, सरचिटणीसपदी गणेश बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली.  

पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, ओबीसी सेलचे अमित खामकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे गजानन भांडवलकर, फुले ब्रिगेड अध्यक्ष दीपक खेडकर, शहर संघटक राजेश भालेराव, माथाडी कामगार शहराध्यक्ष ऋषी ताठे, ऍड. गजेंद्र दांगट, वैभव म्हस्के, फारुक रंगरेज, सुमित कुलकर्णी, रोहन शिरसाठ, आकाश आवटी, क्षितिज वांद्रे, रुपेश चोपडा, संजय सत्रे, यश लिगडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post