सत्ता तिकडे चांगभलं केलं त्यांना आज पश्चात्ताप होताना दिसतोय

 

सत्ता तिकडे चांगभलं केलं त्यांना आज पश्चात्ताप होताना दिसतोय

विधानसभा निकालाची वर्षपूर्तीनिमित्त साजरी करताना राजेंद्र फाळके यांची मार्मिक टिप्पणीनगर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची वर्षपू्र्ती आज झाली. यानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून राष्ट्रवादी काँग्रेस च्या जिल्ह्यातील सहा आमदारांचे अभिनंदन केले. या पोस्टरमध्ये त्यांनी निवडणूकीवेळी पक्ष सोडून गेलेल्यांनाही टोला लगावला आहे. सत्ता तिकडे चांगभलं केलं त्यांना आज पश्चात्ताप होताना दिसतोय, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली आहे.

वाचा राजेंद्र फाळके यांनी काय लिहीलं आहे आपल्या पोस्टरमध्ये

आजच्या दिवशी विधानसभा निवडणुक निकालाला एक वर्ष पुर्ण झाले आहे. वर्षपुर्ती साजरी करत असताना २०१४ साली फक्त तिन आमदार असणा-या अहमदनगर जिल्ह्यात २०१९ मध्ये सहा आमदार निवडून आले. अहमदनगर जिल्हा हा परिवर्तनवादी जिल्हा आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवून दिले. जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त तरुण चेह-यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार, पारनेरचे आमदार निलेश लंके, राहुरीचे आमदार ना. प्राजक्त तनपुरे, कोपरगांवचे आमदार आशुतोष काळे  अशा तरुणांना अहमदनगर जिल्ह्याने विधानसभेत जाण्याची संधी दिली. प्रथम पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्वाचे पद भूषविलेल्या अकोल्यातील बड्या नेत्याचा पराभव आमदार डाॅ.किरण लहामटे सारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीने इतिहास रचला आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार मुसंडी मारली. ज्यांनी पडत्या काळात सत्ता तिकडे चांगभलं केलं त्यांना आज पश्चात्ताप होताना दिसत आहे. मात्र जे एकनिष्ठ राहिले त्यांना न्याय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शिवाय आणि नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.  


या ऐतिहासिक विजयाला एक वर्ष पुर्ण होत असताना माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम करता आहे याचा मनस्वी आनंद होतो आहे. वर्षपुर्तीच्या सर्व आमदारांना खुप खुप शुभेच्छा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post