वर्षपूर्ती होत असताना महाविकास आघाडीत नाराजीचे ‘फटाके’

 


वर्षपूर्ती होत असताना महाविकास आघाडीत नाराजीचे ‘फटाके’ 

कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांबाबतच तक्रारपरभणीः राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. त्यातच कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भर कार्यक्रमात केलेल्या तक्रारीमुळं कॉंग्रेस नाराज असल्याच्या चर्चांना तोंड फुटले आहे. कॉंग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाणांच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील खदखद समोर आल्याचं म्हटलं जातं आहे. ’कॉंग्रेसच्या पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडला मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं चव्हाणांच्या या विधानामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेस आमदारांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तो वाद श्रेष्ठींनी थांबवला असला तरी आता सरकारमधीलच बड्या मंत्र्याने जाहीरपणे नाराजीचा सूर लावल्याने वर्षपूर्ती साजरी करताना महाविकास आघाडीसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post