जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकचा नागरी बँक्स असोसिएशनच्यावतीने गौरव

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकचा नागरी बँक्स असोसिएशनच्यावतीने गौरव

आर्थिक वर्षात ढोबळ नेट एनपीए अत्यल्प राखल्याबद्दल सन्मान


नगर:  अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा गौरव करण्यात आला. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात शिक्षक बॅंकेने  अत्यल्प ढोबळ नेट एनपीए प्रमाण राखले. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन असोसिएशनमध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल महिला बँकेचे संस्थापक संचालक पुष्पलता मरकड तसेच असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश घैसास, मेघाताई काळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथा राऊत, कार्यकारी संचालक कुरापट्टी  उपस्थित होते. सदरचा सन्मान बँकेच्यावतीने बँकेचे चेअरमन शरद सुद्रिक , व्हाईस चेअरमन अर्जुन शिरसाट,संचालक  संतोष दुसुंगे , बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप मुरदारे,अकौंटंट जनार्दन ठोंबळ यांनी स्वीकारला. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला मिळालेल्या गौरवाबद्दल बँकेचे चेअरमन शरदराव सुद्रिक साहेब यांनी असोसिएशनचे आभार मानले.तसेच बँकेस मिळालेल्या या सन्मानामध्ये गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापुसाहेब तांबे व सर्व संचालक, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे,असे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post