राज्यात सरकार आणल्याचा शरद पवार यांना पश्र्चाताप?

 राज्यात सरकार आणल्याचा शरद पवार यांना पश्र्चाताप?मुंबई: जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठविले आहे. जाणत्या राजाला असा दृष्टिकोन शोभत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 


हा अहवाल पाहिला तर त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या २८ नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३० डिसेंबरच्या शपथविधीची छायाचित्रे आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे असे सरकार सत्तेवर आणल्याचा पश्चात्ताप होतो का, हे त्यांनी सांगितले पाहिजे. पण त्यासाठी त्यांनी राज्यपालांच्या अहवालाचा आधार घेऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post