पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरूवारी जिल्हा दौ-यावर

 पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरूवारी जिल्हा दौ-यावर

पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी आणि प्रशासनासोबत आढावा बैठक        अहमदनगर दि.20 ऑक्‍टोबर -  राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे  येत्या गुरुवारी एक दिवसाच्या जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांचा जिल्‍हा  दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            गुरूवार दि. 22 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 7 वाजता मोटारीने शासकीय निवासस्‍थान मुंबई येथुन चाकण मार्गे ता. शेवगाव ता. पाथर्डीकडे प्रयाण. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत शेवगाव तालुका आणि  पाथर्डी तालुका अंतर्गत भालगांवबोधेगांव गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्‍या पिकाची पाहणी. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता कोरोना स्थितीबाबत मा. महापौरमा. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षामा. जिल्‍हाधिकारीमा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी (जि.प.)मा. जिल्‍हा  पोलीस अधिक्षकमहानगरपालिका आयुक्‍तजिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकजिल्‍हा आरोग्‍य अधिकारीसंबंधित अधिकारी वर्ग यांच्‍या समवेत समिती सभागृहजिल्‍हाधिकारी कार्यालयअहमदनगर येथे आढावा बैठक. त्‍याचठिकाणी दुपारी 4.45 वाजता अहमदनगर जिल्‍ह्यातील अतिवृष्‍टीमुळे नुकसान झालेल्‍या पिकांबाबत आढावा बैठक. दुपारी 5.30 वाजता नियोजन भवनजिल्‍हाधिकारी कार्यालयअहमदनगर येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता  शासकीय विश्रामगृह येथे पक्ष पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा. सायंकाळी 7 वाजता मोटारीने अहमदनगर येथुन शासकीय विश्रामगृहपुणेकडे प्रयाण.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post