परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला

परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला

माजी मंत्री पंकजा मुंडे यांची संतप्त प्रतिक्रिया 

मुंबई - भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव इथल्या भगवान भक्ती गडावर घेतलेल्या मेळाव्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, मी अतिवृष्टीची पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असतां गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.

अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post