वय वर्षे '६५' असताना तो करत होता 'हा' नसता उद्योग

 

वय वर्षे '६५' असताना तो करत होता 'हा' नसता उद्योग

स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने केली अटक

नगर : दि.२३/०९/२०२० रोजी फिर्यादी नंदकिशोर रोहीदास ( रा.खराडी शिवार ता.संगमनेर जि.अ.नगर)यांनी फिर्याद दिली कि, त्यांचे ताब्येतील रेड मी कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. सदर घटनेबाबत त्यांनी संगमनेर शहर पो.स्टे. गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना  स्थानिक गुन्हे शाखेने एका ६५ वर्षीय व्यकतीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. भानुदास भाऊ लामखडे ( वय- ६५ रा. देवगाव ता.संगमनेर ) असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्या ताब्यातून चोरलेला ३०००० रु.कि.चा रेडमी कंपनीचा मोबाईल हस्तगत केेला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, प्रभारी  पोलीस अधिक्षक अहमदनगर डॉ. दत्ताराम राठोड ्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््

 अपर पोलीस अधीक्षक काळे मॅडम, पोलिस उपअधीक्षक

रोशन पंडीत साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली

पोना/ सचिन आडबल , पोकॉ प्रकाश वाघ , रणजित जाधव ,/ जालिंदर माने ,/ मेघराज कोल्हे, चालक पोहेकॉ/ संभाजी कोतकर यांनी केली.

 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post