महानगरपालिकेचे सन २०२०-२१ चे ७१५ कोटीचे महासभेस सादर

 महानगरपालिकेचे सन २०२०-२१ चे ७१५ कोटीचे महासभेस सादरअहमदनगर - अहमदनगर महानगरपालिकेचे सन २०२०-२०२१ चे ७१५ कोटीचे मुळ अंदाजपत्रक
दि. २६/१०/२०२० रोजी अंदाजपत्रक महासमेत महापौर  बाबासाहेब वाकळे यांचेकडे
सादर केले. सदरची सभा ऑनलाईन आयोजित करणेत आली होती.
सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. २९४ कोटी ७३ लाख, भांडवली
जमा रु. ३८० कोटी ०१ लाख धरणेत आले आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी रु. ३४
कोटी, शास्ती पोटी रु. ५५ कोटी, संकलीत करावर आधारीत करापोटी १४ कोटी, जी एस टी
अनुदान ९५ कोटी ७४ लाख व इतर महसुली अनुदान रु. ३ कोटी, गाळा भाडे ३ कोटी,
पाणीपट्टी १८ कोटी, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी ४२ कोटी, संकीर्णे ९८ लाख इ. महत्वाच्या
बाबीसह महसुली खर्च २४१ कोटी ७६ लाख धरण्यात आला आहे. तसेच भांडवली कामांवर
अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन रु. ४३३ कोटी २७ लाख अंदाजित जमा होणार आहेत.
अहमदनगर शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा आणखी प्रयत्न करणार आहोत.
शासन अनुदानातून अमृत योजना, सर्वांसाठी घरे, नगरोत्थान योजना, मुलभूत सोयी सुविधा
योजना इ. योजना राबवुन सर्व भागांच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे.
तसेच खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १२१ कोटी, पेन्शन ३१ कोटी, पाणी पुरवठा
विज बिल ३४ कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ९ कोटी ५० लाख, शिक्षण मंडळ वर्गणी ३ कोटी
६५ लाख, महिला व बाल कल्याण योजना १ कोटी ३६ लाख, अपंग पुनर्वसन योजना १ कोटी
३६ लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ४ कोटी ०७ लाख, मा. सदस्य मानधन १ कोटी
८० लाख, औषधे व उपकरणे ६० लाख, मा. सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ५ कोटी ९६ लाख,
कचरा संकलन व वाहतूक १ कोटी ,पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती ७० लाख,
टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी १ कोटी ६५ लाख, अशुध्द पाणी
आकार १ कोटी ७५ लाख यासह शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीची मनपा
हिस्स्याची रक्कम भरणे प्रस्तावित आहे. यावेळी आयुक्त  श्रीकांत मायकलवार, उपायुक्त
 प्रदीप पठारे, मुख्यलेखाधिकारी प्रविण मानकर, नगरसचिव शाहजहान तडवी,
लेखा विभागाचे  अनिल लोंढे आदी उपस्थित होते. सभा ऑनलाईन असल्याने पदाधिकारी,
सदस्य व खातेप्रमुख ऑनलाईन होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post