राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी सत्यजित तांबेंना संधी द्यावी

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी सत्यजित तांबेंना संधी द्यावीकर्जत (प्रतिनिधी):-युवकांचे प्रेरणा स्थान असलेले व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून काँग्रेसने संधी द्यावी अशी मागणी कर्जत जामखेडचे विधानसभा युवक अध्यक्ष सचिन घुले यांनी पत्रव्यवहार करून केली होती आज या मागणी नुसार सत्यजित तांबे यांचे नाव चर्चेत आले असताना घुले यांनी  पांडुरंगाला साकडे घालत आपल्या मागणीला यश मिळावे यासाठी मनोभावे प्रार्थना केली आहे.

              युवक काँग्रेसच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी राज्यात काँग्रेसचे चांगले संगठन उभारले असून कोरोनाच्या काळात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 25 हजार बाटल्या रक्त उपलब्ध करून दिले होते, गोरगरिबांना किराणा आणी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे, युवकांना रोजगार मिळवून देणे, यासह विविध अभियान राबविले असून यामध्ये शेतकरी बचाव रॅली, रोजगार दो न्याय दो अभियान याद्वारे केंद्र शासनाला राज्यातून इशारा दिला, अशा तरुण तडफदार युवक नेतृत्वाला आमदारकीची संधी मिळाल्यास त्याचा नक्कीच काँग्रेस पक्षाला चांगला फायदा होईल. काँग्रेसला विधान परिषदेच्या चार जागा मिळालेल्या असून यामध्ये सत्यजित तांबे यांची वर्णी लागावी अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष सचिन घुले यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी अगोदरच काँग्रेसच्या वरिष्ठांना पाठविले असून त्या अनुषंगाने तांबेना संधी मिळावी यासाठी आज एकादशीचे औचित्य साधत युवक कार्यकर्ता बरोबर पांडुरंगासह कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाना साकडे घातले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post