अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर वर्णी ?

 अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर वर्णी ?मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी कॉंग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा आहे. कॉंग्रेसकडून अजून नावे ठरलेली नाहीत. पण उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा असल्याचं पुढे आलं आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मार्च 2019 मध्ये कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेसने त्यांनी उमेदवारी ही दिली होती. पण भाजप आमदार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर त्या सक्रिय राजकारणापासून दूर झाल्या. परंतु आता पुन्हा एकदा कॉंग्रेसकडून त्यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post