दसरा मेळाव्याची परंपरा नव्या रुपात, माजी मंत्री पकजा मुंडे यांचे आवाहन
बीड: भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावेळीही दसर्याला सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर जाण्याचं जाहीर केलं आहे. फक्त यावेळी दसरा मेळावा प्रत्यक्ष न होता ऑनलाईन करण्यात येणार आहे. संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावातील दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने भक्तांनी सावरगावत येऊ नये, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित होणार नाही. मात्र, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मेळावा ऑनलाईन होणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान भक्तीगडावर कोणीही गर्दी करु नये. घरातच राहून भगवान बाबांचे दर्शन घेण्याचे आवाहन मुंडेनी केली आहे.
Post a Comment