राज्यातील "मेगाभरती''बाबत लवकरच सकारात्मक बातमी

 राज्यातील मेगाभरतीबाबत लवकरच सकारात्मक बातमी

आ.रोहित पवार यांचे सूचक व्टिटनगर : राज्यातील फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेला 72 हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीचा विषय नवीन महाविकास आघाडी सरकारच्याही अजेंड्यावर आहे. मात्र करोनामुळं या मेगाभरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांनी मेगाभारतीबाबत लवकरच सकारात्मक बातमी मिळेल, असे व्टिट केले आहे. एका युवकाने व्टिटरवरच आ.रोहित पवार यांना 72 हजार जागांच्या भरतीबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आ.रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ’मेगाभरतीचा शब्द आम्ही पाळणार आहोत. आतापर्यंत हे विचारण्याची वेळच तुमच्यावर आली नसती, पण आपण पाहत आहात की सरकार आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकट येतायेत. तरीही सरकारला युवांची काळजी आहे. लवकरच आपल्याला सकारात्मक बातमी मिळेल.’, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post