आठवडा बाजारावेळी व्यापारी व ग्राहकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे

 आठवडा बाजारावेळी व्यापारी व ग्राहकांनी मास्कचा वापर करणे गरजेचे

अंभोरा पोलिस स्टेशनचे सपोनि ज्ञानेश्र्वर कुकलारे यांचे आवाहनआष्टी: आष्टी तालुक्यातील अंभोरा  पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या ज्या गावात आठवडी  बाजार भरत आहे त्या व्यापाऱ्यांनी कोवीड-19 च्या सुरक्षा नियमांचे पालन करत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्कचा  वापर करावा असे आवाहन अंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी केले. 


 ते पुढे म्हणाले, कोरोना हा आजार पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने  स्वतःची काळजी घेतली पाहिजे. व्यापाऱ्यांनी तोंडाला मास्क लावूनच ग्राहकांशी संपर्क साधावा‌ दुकानासमोर जास्त गर्दी करू नये जेणेकरून सोशल डिस्टन चा बोजवारा उडणार नाही व प्रशासनाच्या नव्या आदेशाचे पालन करावे. पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील  आठवडी बाजार सुरू आहेत. त्यामुळे कोरणा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी व जनतेने काळजी घ्यावी व प्रशासनाच्या नवीन नियमाचे पालन करावे असे अहवान कुकलारे यानी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post