मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन पार्थ पवारांचे खडेबोल
मराठा नेत्यांना आता जागं व्हावं लागेल
मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणसाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी व्टिट करीत विवेकच्या दुर्दैवी मृत्युचा दाखला देत मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. ‘मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ’विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.’ अशा शब्दात पार्थ पवार यांनी भूमिका मांडली आहे.
Post a Comment