मंदिरे खुली होण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी : माजी मंत्री शिवाजी कर्डिले
गुरव समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात
नगर : मंदिरे खुले करण्याबाबत राज्य सरकारला अजून जाग आलेली नाही. सरकारने देशी विदेशी दारु, परमिट रूमला तातडीने परवानगी दिली. मात्र मंदिराबाबत सरकार वेगळी भूमिका घेतली आहे. येत्या आठ दहा दिवसांत निर्णय घेतला नाही तर भाजपला पुन्हा रस्तयावर उतरावे लागेल, असा इशारा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिला आहे.
नगरमधील गुरव समाजाच्या शिष्टमंडळाने धार्मिक स्थळे खुले होण्यासाठी कर्डिले यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी बोलताना कर्डिले यांनी सांगितले की, मंदिरे बंद असल्याने मंदिराशी निगडीत अर्थकारणाला फटका बसला आहे. राज्य सरकारने मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भाजपने आधीच आंदोलन केले आहे. तरीही सरकारला अद्याप जाग आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी करावी लागेल.
व्हिडिओ
Post a Comment