जिल्ह्यात मनाई आदेश जारी, ‘या’ गोष्टींवर असतील निर्बंध\
अहमदनगर दि.28 :- अहमदनगर जिल्हयात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत जिल्ह्याच्या महसूल सीमेच्या हद्दीत मुंबई पोलीस अधीनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार खालील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात, शस्त्रे, काठया, सोटे, त
हे आदेश खालील व्यक्तीस आदेश लागु होणार नाही. यामध्ये,शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. प्रेतयात्रा/अंत्यविधीस सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन जास्तीत-जास्त 20 व्यक्तींची उपस्थिती. लग्नसमारंभ सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन जास्तीत-जास्त 50 व्यक्तींची उपस्थिती. तसेच उपरोक्त नमूद कालावधीकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144अन्वये वेळोवेळी निर्गमित होणारे प्रतिबंधात्मक आदेशात सवलत दिलेल्या बाबींस / व्यक्तींस लागु होणार नाहीत, असे कळविण्यात आले आहे.
Post a Comment