अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीसाठी 10 हजार कोटींच पॅकेज


अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीसाठी 10 हजार कोटींच पॅकेज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची घोषणा, प्रति हेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदतमुंबई: अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारनं 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यात जिरायती व बागायतीच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत दिली जाईल. फळबागांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी 25 हजार रुपये मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राकडून जीएसटी तसेच अन्यबाबींपोटी तब्बल 38 हजार कोटी येणं असल्याच सांगितलं. तसेच राज्यातील शेतकर्‍यांसाठी केंद्राकडूनही भरीव मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post