पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत...VIDEO

पाथर्डी तालुक्यात  बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीतनगर : नगरमधील पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे पाथर्डीतील गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. पाथर्डी तीळ करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेलं होतं. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिमही सुरु केली होती. त्यानंतर आज सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये बिबट्यानं हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. तसेच पाथर्डीत धुमाकूळ घालणाऱ्या या बिबट्याची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाली आहेत. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर उभं ठाकलं आहे. 


VIDEO सौजन्य : विक्रम बनकर
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post