अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ वादाच्या भोवर्‍यात, राष्ट्रीय हिंदू सेना आक्रमक

 अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ वादाच्या भोवर्‍यात, राष्ट्रीय हिंदू सेना आक्रमकमुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा आगामी चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादात सापडला आहे. लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचे नाव बदलावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या नावामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हणत, राष्ट्रीय हिंदू सेनेने या चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, तिचा सन्मान करतो, तिच्या नावापुढे बॉम्ब असा शब्द लिहिणे अतिशय निंदनीय आहे. अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे देखील हिंदू सेनेने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post