शेतकर्‍यांना अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी एकरी 1 लाखांची मदत करावी : माजी मंत्री शिवाजी कर्डिले

 शेतकर्‍यांना अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी एकरी 1 लाखांची मदत करावी : माजी मंत्री शिवाजी कर्डिले

भाजपचा कोणताही बडा नेता राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता दिसत नाहीश्रीगोंदा : करोनामुळे अर्थकारणावर मोठा परिणाम झाला असला तरी अहमदनगर जिल्हा मध्यर्ती सहकारी बँकेने शेतकरी व साखर कारखान्यांना नियमानुसार कर्ज देण्याची भूमिका घेतली आहे. आताच्या परिस्थितीत राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हतबल झाला असून राज्य सरकारने तातडीने एका एकराला एक लाख रुपये याप्रमाणे शेतकर्‍याला मदत देण्याची गरज आहे, असे मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले

कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच कर्डिले यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आ.राहुल जगताप यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री कर्डिले यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करीत तातडीने एकरी 1 लाख रुपये मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा कोणताही बडा नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता मला वाटत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post