कांद्याच्या वखारीवर विज पडून पाच लाखाच्या कांद्याचा कोळसा

 कांद्याच्या वखारीवर विज पडून पाच लाखाच्या कांद्याचा कोळसा.....कौठा येथील घटना 
          श्रीगोंदा - तालुक्यातील कौठा येथील शेतकरी चंद्रकांत आप्पासाहेब सूर्यवंशी यांच्या कांदा वखारीवर वीज पडून पाचशे गोणी कांदा क्षणात जळून भस्मसात झाला आणि पाच लाखाचे नुकसान झाले.
           चंद्रकांत सुर्यवंशी यांनी मोठ्या कष्टातून कांदा पिकविला जादा भाव मिळेल या अपेक्षेने कांदा वखारीत साठवला होता. या वखारीवर रात्री वीज पडून कांद्याचे मोठे नुकसान झाले. वीज पडल्याने कांद्याची निम्मी वखार जळाली तर राहिलेली वखार पावसाच्या पाण्यात खराब झाली आहे. 
       रात्री तालुक्यात सर्वदूर झालेल्या पावसात सूर्यवंशी यांच्यावर वखारीवर वीज पडली. त्यामुळे कांद्याच्या वखारीवरील प्लास्टिक कागद व त्याखालील निम्मा कांदा विजेच्या आगीत सापडला. शिवाय रात्रभर पाऊस चालू असल्याने राहिलेला कांदा पाण्याने खराब झाला आहे.कृषी विभागाने या घटनेचा पंचनामा करून  चंद्रकांत सुर्यवंशी या शेतकऱ्यास शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post