जिल्हा वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा मी

 

जिल्हा वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

वाचन संस्कृती आदर्श जीवनास प्रेरणादायी

अजित रेखे
     नगर - स्पर्धेच्या  माहिती तंत्रज्ञानाच्या ऑनलाईन युगातही मानवी जीवनात पुस्तकांचे महत्व अमुल्य आहेमानवी मनाच्यासंस्काराचाकल्पनाशक्तीचा विकास करणार्या वाचन संस्कृतीमुळे आदर्श जीवनात प्रेरणा मिळेल असा विश्वास वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी यांनी व्यक्त केला.

     अहमदनगर जिल्हा वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम जयंतीदिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ प्रसंगी ते बोलत होतेयावेळी संचालक किरण आगरवालअनिल लोखंडेग्रंथपाल अमोल इथापे,  नितीन भारताल  वाचक उपस्थित होते.

      याप्रसंगी लाकडाऊननंतर वाचनालय सुरु झाल्यानंतर उपस्थित वाचकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  अजित रेखी  मान्यवरांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

     याप्रसंगी वाचनालयाचे पल्लवी कुक्कडवालवर्षा जोशीसंजय गाडेकरविठ्ठल शहापुरकरकल्पना घबाडेसंकेत पाठक  वाचक सभासद उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post