जगदंबा देवी मंदीरातील फुल लावण्याचा कार्यक्रम न झाल्याने भाविकांमध्ये संताप

 जगदंबा देवी मंदीरातील फुल लावण्याचा कार्यक्रम न झाल्याने भाविकांमध्ये संतापकर्जत ((आशिष बोरा)-:-श्री जगदंबा देवी मंदिरात नावरात्रोत्सवा मध्ये दसऱ्याच्या दिवशी देवीला फुल चढवून कौल मागण्याचा अत्यंत महत्वाचा विधीच केला गेला नाही यामुळे याबाबत निवेदन देऊन हा विधी पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

              कोरोना च्या पार्श्वभूमीवर राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरात नवरात्रोत्सवा दरम्यान सर्व विधी पार पाडण्यासाठी शासनाच्या नियमाच्या  अधीन राहून तहसीलदार कर्जत यांनी श्री जगदंबा देवी मंदिर ट्रस्ट यांना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पत्र देऊन निकष घालून देत रूढी व परंपरा जपत पाच पुजार्‍यांना विधी करण्यासाठी नवरात्र उत्सवामध्ये सर्वस्वी जबाबदारीचे आदेशाने पुजाऱ्यांना विधी करण्यास परवानगी दिली होती. 

           नवरात्रोत्सवा मध्ये घटस्थापना ते घट उठविण्यात पर्यंत पारंपारिक पद्धतीने विधी पार पडला परंतु दसऱ्याच्या (विजयादशमीच्या) दिवशी देवीला फुल चढवून कौल मागण्याचा अत्यंत महत्वाचा विधी असतो, मात्र यावर्षी नवरात्रोत्सवामध्ये सर्व कार्यक्रम विधिवत पार पडले असताना फुल चढवून कौल मागण्याचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असतो व या विधीस राशीन व परिसरात विशेष महत्त्व आहे, परंतु पुजाऱ्यानी जाणीवपूर्वक हा महत्वाचा विधी केला नाही, महाराष्ट्र शासन व तहसीलदार यांचे सक्त आदेश असताना देखील  सदरील आदेशाचे पालन पुजारी व श्री जगदंबा देवी पब्लिक राष्ट्रीय यांनी केलेले नसून त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेला आहे यामुळे लाखो भाविकांच्या भावनांचा अनादर केलेला आहे.

                 या प्रकरणाची सखोल चौकशी करून समजतात काय काय देशील कारवाई करण्यात यावी तसेच श्री जगदंबा देवी कौल मागण्याचा विधी कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर शासना मार्फत आदेश काढून करण्यात यावा अशी मागणी राशीन व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थानी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास आशिया पंचक्रोशीतील जनतेत असंतोष निर्माण होऊ शकतो याची सर्व जबाबदारी प्रशासन व तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानंतर जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट व पुजारी यांची राहील असेही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर श्याम कानगुडे, शाहू राजे भोसले, रामकिसन साळवे, सुभाष जाधव, तात्यासाहेब माने, माऊली सायकर, अशोक जंजिरे, राम कानगुडे, विक्रम राजे भोसले,  प्रवीण आंधळकर, गणेश कदम, सुनिल गोसावी, विशाल शेटे यांच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post