राज्यपाल कोश्यारी यांच्या 'त्या' पत्रावरून गृहमंत्री अमित शहांचा नाराजीचा सूर

 राज्यपाल कोश्यारी यांच्या 'त्या' पत्रावरून गृहमंत्री अमित शहांचा नाराजीचा सूर

 'शब्द' वापरताना काळजी घेण्याची गरज होती
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील मंदिरं खुले करण्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला होता. यावरून उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना उत्तर दिलं होत. या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सल्ला दिल्ला दिला आहे. कोश्यारी शब्द जपून वापरायला हवेत, असं शहा म्हणाले. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र मी वाचलं आहे. या पत्रात कोश्यारी यांनी काही संदर्भ दिले आहेत. कोश्यारी यांनी शब्द जरा जपून वापरायला हवे होते. त्यांच्या शब्दांची निवड चुकली, असं अमित शहा म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post