पेट्रोलची चिंता सोडा, 'हिरो'ने केली दमदार इलेक्ट्रीक दुचाकींची निर्मिती

 पेट्रोलची चिंता सोडा, 'हिरो'ने केली दमदार इलेक्ट्रीक दुचाकींची निर्मिती

एकदा चार्ज केल्यानंतर 70 किमी ते 200 किमी पर्यंत प्रवास, किंमतही आवाक्यातनवी दिल्ली, : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. चारचाकी वाहनांबरोबरच अनेक दुचाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांची निमिर्ती करण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणाऱ्या हिरो इलेक्ट्रिकने आपल्या नवीन इलेक्ट्रिक गाड्यांची घोषणा केली आहे. खास शहरी भागांसाठी या गाड्यांची निर्मिती करण्यात आली असून याला सिटी स्पीड असं नाव देण्यात आलं आहे.

इतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत ही गाडी मजबूत आणि जास्त स्पीड असणारी आहे. शहरी भागातील फ्लायओव्हर आणि स्लोपवरही या गाड्या चांगल्या चालतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. 


या गाड्या स्वस्त किंमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचा कंपनीचा दावा आहे. 57,560 रुपयांपासून या गाड्यांच्या किंमत सुरु होत आहे. यामध्ये पॉवरफुल बॅटरी असून, एकदा चार्ज केल्यानंतर 70 किमी ते 200 किमी पर्यंत ही गाडी प्रवास करू शकणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post