जिल्हा परिषदेला हेलिकॉप्टरने प्रचार...फायदा की तोटा?

 जिल्हा परिषदेला हेलिकॉप्टरने प्रचार...फायदा की तोटा?

खा.सुजय विखे यांनी उलगडले हवाई प्रचाराचे गुपितनगर : नगर जिल्ह्याच्या राजकारणात मागील जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये असलेल्या डॉ.सुजय विखे यांनी हेलिकॉप्टरने फिरत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. विखेंचा हा हवाई प्रचार तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. आज वाळकी येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे दिलीप भालसिंग यांनी विखेंसमोरच त्यांच्या हेलिकॉप्टर प्रचाराची आठवण करून देत विखेंच्या समर्थकांकडून माजी आ.शिवाजी कर्डिले व त्यांच्या समर्थकांवर होणार्‍या टिकेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी विखेंनी वाळकी परिसरात कॉंग्रेसच्या बाळासाहेब हराळ यांचा प्रचार केला होता. भालसिंग यांच्या वक्तव्यानंतर बोलताना खा.डॉ.सुजय विखे यांनी हेलिकॉप्टर प्रवासाचा किस्सा सांगत उत्तर दिले.

खा.विखे म्हणाले की, आज मी भाजपचा खासदार आहे. आपलं हेलिकॉप्टर तेव्हाही होतं व भविष्यातही फिरत राहणार. त्यावेळी हेलिकॉप्टरमुळं माझं तिकीटही कापलं गेलं होतं. त्यावेळी मी कॉंग्रेसमध्ये होतो व राष्ट्रवादीशी आघाडी होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला विचारलं होतं की तु आताच हेलिकॉप्टरमध्ये फिरतोस. निवडून कसा येणार? पुढे काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यावेळी माझं नुकसान झालं. पण आता वाटतं बरं झालं की त्यांचे तिकिट मिळालं नाही. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा खासदार आहे. आज मी आनंदीतच आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post