स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वाहनास अपघात

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वाहनास अपघात
 


राहुरी येथे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी गेलेल्या शेवगाव तालुका शेतकरी स्वाभिमानी शिष्टमंडळाच्या वाहनास नगर औरंगाबाद रोड वरील घोडेगाव नजीक दुपारी दीडच्या दरम्यान अपघात झाला,

      स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ तालुक्यातील अमरापुर,फलकेवाडी,भगूर या भागातील शेतकऱ्यांना घेऊन या शिष्टमंडळात मध्ये अमरापुर येथील सरपंच विजुभाऊ पोटफोडे,नारायण पोटफोडे उपस्थित होते,तालुक्यातील विजेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सोमवारी राहुरी येथे गेले होते, मंत्री महोदयांची भेट उरकून शिष्टमंडळ हे शेवगाव च्या दिशेने येत असताना, नगर-औरंगाबाद या महामार्गावर घोडेगाव नजीक पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला पाठीमागून येणाऱ्या एम एच 46 AF 6307 या वाहनाने जोराची धडक दिली, या धडकेमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला,पदाधिकाऱ्यांना या धडकेने मुका मार बसला, यावेळी वाहनांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत भराट तालुका पक्ष अध्यक्ष प्रवीण मस्के,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, मेजर अशोक भोसले,अमोल देवढे  हे या अपघातातून बालंबाल बचावले, यावेळी नेवाशाचे सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे

त्यांना तत्काळ शेजारील रुग्णालयामध्ये आणल्यानंतर उपचार करुन सोडण्यात आले, यावेळी शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते अंबादास कोरडे यांनी यावेळी सर्वांना धीर दिला,

 यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच आम्ही या अपघातातून थोडक्यात बचावले आहोत,असेच आशीर्वाद पुढील काळातही आमच्या मागे असू द्या,आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कायम बांधील राहू व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा प्रयत्न करू असे यावेळी फटांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले,


पुढील आठवड्यात मंत्रीमहोदय घेणार आढावा बैठक

यावेळी गेलेल्या शिष्टमंडळास शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या विजेच्या प्रश्नासाठी पुढील आठवड्यामध्ये शेवगाव तालुक्याची आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी या शिष्टमंडळात शब्द दिला आहे,

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post