मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली गेलीय

 

मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली गेलीय

शिवसेनेच्या खासदाराची पोलिसात तक्रार




परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय  जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरा स्वत: परभणीतील नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

“मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा” असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post