उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण 



मुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना  मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे.

तसंच,  राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post